आरती संग्रह
आरती संग्रह WELCOME आरती संग्रह पुंडलिका वर दे, हरी विठ्ठल || || श्री ज्ञानदेव , तुकाराम|| || पंढरीनाथ महाराज कि जय || || श्री ज्ञानेश्वर महाराज कि जय || || जगद्गुरू तुकाराम महाराज कि जय || 1.श्री गणपतीची आरती सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।। रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरे जडित मुकुट शोभतो बरा । रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।।२ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।। लंबोदर पीतांबर फणीवरवंदना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना । जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती । 2.शंकराची आरती लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा। वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।। लावण्यसुंदर मस्तकीं बाळा। तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।। जय देव जय देव जय...